शेवगाव तालुक्यातील राक्षी येथील स्व.श्री.मेजर सचिन साळवे यांना अखेरचा निरोप अंत्यविधी साठी पंचक्रोशीतील जनसागर उसळला

शेवगाव तालुक्यातील राक्षी येथील स्व.श्री.मेजर सचिन साळवे यांना अखेरचा निरोप अंत्यविधी साठी पंचक्रोशीतील जनसागर उसळला



राक्षी येथील रहिवासी मेजर सचिन रामकिसन साळवे वय 33 हे आसाम मधील गुवाहाटी येथे नक्षलवाद्याशी झालेल्या चकमकीमध्ये गोळी लागून वीरमरण आले

आज सकाळी दहा वाजता त्यांच्यावर त्यांच्या राहत्या गावी रक्षी तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगर येथील शासकीय विमानात अंत्यसंस्कार करण्यात आले सकाळी साडे आठ वाजता शेवगाव शहरातील आंबेडकर चौक येथे त्यांचे पार्थिव आले असता शेवगाव शहरातील नागरिकांनी त्यांच्या अंतिम दर्शनासाठी गर्दी केली होती.
त्यानंतर त्यांच्या राहत्या गावी राक्षी येते त्यांचे पार्थिव नेण्यात आले.
राक्षी गाव पंचक्रोशीतील हजारो लोक यावेळी मेजर सावे यांच्या अंतिम दर्शनासाठी उपस्थित होते यावेळी अमर रहे अमर रहे घोषणा देत देण्यात आल्या यावेळी अतिशय भावनिक वातावरणात होते.

मेजर सचिन साळवी यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक
शाळा राक्षी येथे झाली महाविद्यालयीन शिक्षण शेवगाव येथे पूर्ण झाले ते भारतीय लष्करात 2011 साली भरती झाले.

त्यांच्या मागे आई-वडील पत्नी लहान मुलगी वय पाच वर्ष दोन भाऊ असा परिवार आहे त्यांचा लहान भाऊ राहुल साळवे हा भारतीय लष्करामध्ये नवसारा जम्मू-काश्मीरमध्ये कार्यरत आहे यावेळी विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी तसेच भारतीय लष्करातील अधिकारी महसूल चे अधिकारी पोलीस प्रशांत चे कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

Comments