शेतकऱ्यांना नवीन विहिरीसाठी मिळणार 3 लाखा रुपयापर्यंत कर्ज असा करा अर्ज

नमस्कार मित्रांनो आज आम्ही घेऊन आलोय शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आता राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना नवीन विहिरीसाठी जवळपास तीन लाख रुपयांपर्यंतचे अनुदान देणार आहे. तर चला बघूया की कोणते शेतकरी या योजनेचा लाभ घेतील किंवा पात्र असणार आहे व त्यासाठी कोणकोणते कागदपत्राची आवश्यकता असणार आहे‌.

नवीन विहीर योजना 2022

शेतकऱ्यांना नवीन विहीर करण्यासाठी राज्य सरकारकडून 3 लाख रुपये अनुदान देणार आहे. आता शेतकरी आपल्या शेतात स्वतःची नवीन विहीर करू शकतात राज्य सरकारकडून ही 5hp मोटर कृषी पंपासाठी आणखी 25 हजार रुपये पर्यंत अनुदान मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न खूप मोठ्या प्रमाणावर कमी होणार आहे. 

सिंचन विहिरी साठी किती अनुदान मिळणार

नविन विहिरी साठी 3 लाख रुपये, जुनी विहीर दुरुस्तीसाठी 50 हजार रुपये, इनवेल बोरिंग 20 हजार रुपये, पंप संच साठी 20 हजार रुपये, वीज जोडणी आकार 10 हजार रुपये, तुषार सिंचन 25 हजार रुपये, ठिबक सिंचन 50 हजार रुपयेन

नवीन विहीर योजनेसाठी पात्रता

लाभार्थी अनुसूचित जाती प्रवर्गातील असणे यासाठी बंधनकारक, लाभार्थीने आपले जातीचा दाखला सादर करणे बंधनकारक आहे, जमिनीचा सातबारा उतारा बंधनकारक आहे, लाभार्थीचे वार्षिक उत्पन्न मर्यादा रुपये दीड लाखाची असावे, जमीन 0.20 पर्यंत असणे आवश्यक आहे 

नवीन विहिरी साठी लागणारे कागदपत्रे 

लाभार्थी प्रतिज्ञापत्र, 7/12 व 8 चा उतारा अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र, अपंग असल्यास प्रमाणपत्र, सामायिक एकूण धारक क्षेत्राचा दाखला, कृषी अधिकारी यांचे क्षेत्र पाहणी व शिफारस पत्र, गटविकास अधिकारी चे शिफारस पत्र, ग्रामसभेचा ठरा, ज्या जागेवर विहीर आहे त्या जागेचे फोटो व कागदपत्रे आवश्यक आहे.

Comments