मित्रांनो 50 हजार प्रोत्साहन अनुदान ज्या शेतकऱ्यांना मिळणार आहे त्या संदर्भात याद्या कुठून बघायच्या तर ह्या याद्या कुठेही ऑनलाइन प्रदर्शित झालेल्या नाहीत. तर या याद्या ऑफलाइन पद्धतीने सरकारने बँकेकडे व सोसायटीकडे प्रदर्शित केलेले आहेत म्हणजेच आपण ज्या बँकेकडून किंवा सोसायटीकडून कर्ज घेतलेले आहे तिथे तुम्हाला जायचे आहे. तिथे या याद्या सरकारने पाठवलेले आहेत. तुम्ही तिथे पाहू शकतात की या याद्यांमध्ये आपले नाव आहे की नाही.
त्याचबरोबर याद्या पाहिल्यानंतर तुम्हाला ही अनुदान केव्हापर्यंत मिळेल हा एक प्रश्न तुमच्या मनामध्ये असेल. तर हे अनुदान सरकारने स्वतः जाहीर केले होते की 15 सप्टेंबर पासून जे काही अनुदान आहे ती वितरित करण्यात चालू होईल म्हणजेच 16 सप्टेंबर पासून हे अनुदान थेट शेतकऱ्यांच्या बँक खाते मध्ये यांची रक्कम जमा होईल. हळूहळू सर्व शेतकरी व लाभार्थीना ही रक्कम मिळून जाईल तर अशा पद्धतीची नवीन अपडेट होती.
Comments
Post a Comment