50 हजार रुपये प्रोत्साहन अनुदान कोणाला व किती मिळणार पहा सविस्तर माहिती



शेतकऱ्यांना मिळणार 50 हजार रुपये प्रोत्साहन अनुदान

प्रत्येक नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना वाटतं हे 50 हजार प्रोत्साहन अनुदान सर्वांना सारखेच मिळेल परंतु असे नाही शासनाने एक अट ठेवली आहे सन 2017-18 / 2018-19 / 2019-20 या तीन वर्षात दोन वर्ष कर्जाची परतफेड शेतकऱ्याने केलेली असावी तोच शेतकरी या प्रोत्साहन अनुदानासाठी पात्र असेल.

कोणत्या शेतकऱ्याला किती प्रोत्साहन मिळेल ?

शेतकऱ्याने जितके कर्ज बँकेतून उचलले आहे त्यानुसार तितकेच त्याला प्रोत्साहन देण्यात येईल. उदा. एखाद्या शेतकऱ्याने जर समजा 50 हजार कर्ज घेतले असेल तर त्याला पूर्ण 50 हजार प्रोत्साहन मिळेल. आणि ज्या शेतकऱ्याने समजा 25/30 हजार कर्ज घेतले असेल तर त्याला तितकेच प्रोत्साहन मिळेल. जर एखाद्या शेतकऱ्याने 50 हजार पेक्षा जास्त कर्ज घेतले असेल तर त्याला जास्तीत जास्त 50 हजार पर्यंतच प्रोत्साहन अनुदान देण्यात येईल.

आणि कमी-जास्त घेतले असेल तर त्याला बँकेच्या आकडेवारीनुसार दिले जाईल.

Comments