नमस्कार शेतकरी मित्रांनो 50 हजार प्रोत्साहन अनुदान येण्यासाठी उशीर का लागत आहे आणि कशामुळे हे अनुदान शेतकऱ्यांना आणखीन पण मिळालेली नाहीत तर याबाबत आपण या माहितीतून पाहणार आहे
50 हजार रुपये प्रत्सोहन अनुदान मिळण्यासाठी या कारणामुळे होणार उशीर
मित्रांनो महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची माहिती ही बँकेमार्फत पुढे पाठवण्यात आली होती. परंतु बँकांमध्ये भरण्यात आलेल्या माहितीमध्ये राज्यातील जवळपास 7 लाख 77 हजार कर्ज खात्याची माहिती ही चुकीची असल्याचे निदर्शनास आलेले आहे.
मित्रांनो या संबंधित बँकेमार्फत भरण्यात आलेली चुकीची माहिती लवकरात लवकर दुरुस्त करून पाठवण्याची आदेश सरकार विभागामार्फत जिल्हा बँकेंना दिलेले आहेत.
विशेषता यामध्ये छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद, लातूर, जालना, सोलापूर, नांदेड, बीड, अमरावती अशा अनेक बऱ्याच जिल्ह्यातील बँकामार्फत कर्ज खात्याची भरण्यात आलेली सगळी माहिती चुकीची आहे. त्यासाठी शासनाकडून बँकेतील कर्मचाऱ्यांमार्फत कर्जमाफीच्या पोर्टलवर माहिती अपलोड करण्यासाठी निर्देश देण्यात आलेले होते. परंतु जिल्हा बँकेतील कर्मचाऱ्यामार्फत माहिती अपलोड केल्यानंतर पडताळणी दरम्यान राज्यातील 7 लाख 77 हजार कर्ज खात्याची माहिती ही चुकीची भरण्याची निदर्शनास आलेले आहे. त्यामुळे पन्नास हजार रुपये प्रोत्साहन अनुदान शेतकऱ्यांना मिळण्यासाठी आणखीन काही दिवस लागू शकतील
Comments
Post a Comment