नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची दिवाळी होणार गोड
पहिली यादी जाहीर : जिल्ह्यातील ८ हजार ८८९ शेतकऱ्यांचा समावेश
नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रोत्साहनपर ५० हजार रुपये अनुदान देण्याचे शासनाने जाहीर केले होते. त्यासाठी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी जिल्ह्यातील ८ हजार ८८९ शेतकऱ्यांची पहिल्या यादीत निवड झाली आहे. त्यांना विशिष्ट क्रमांक त्यांच्या नोंदणीकृत मोबाईलवर पाठविला आहे. सदर शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जाच्या रकमेनुसार प्रोत्साहनपर अनुदान दिवाळीपूर्वी जमा होण्याची शक्यता आहे.
येथे पहा लाभार्थी शेतकरी यादी
शेतीशी संबंधित कर्ज घेण्याचे प्रमाण मागील काही वर्षात वाढले आहे. त्यात कर्जाची परतफेड न झाल्याने अनेकवेळा कर्जमाफी मागितल्या जाते आणि शासनाकडून कर्जमाफी दिली जाते; परंतु अशावेळी नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या पदरी केवळ निराशाच पडते, अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळावे आणि नियमितपणे कर्ज परतफेड करणाऱ्यांची संख्या वाढावी या उद्देशाने शासनाने योजना आणली.
नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी सन २०१७-१८. सन २०१८-१९ आणि सन २०१९ २० हा कालावधी विचारात घेतला जाणार आहे.
■ या तीन आर्थिक वर्षांपैकी कोणत्याही दोन आर्थिक वर्षात पीक कर्जाची उचल करून नियमितपणे परतफेड केलेल्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. कर्जाच्या मुद्दलाच्या रकमेइतका प्रोत्साहनपर लाभ दिला जाईल.
महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी जिल्ह्यातील ५९ हजार ४१३ शेतकऱ्यांची माहिती ऑनलाईन करण्यात आली आहे. त्यातील ८ हजार ८८९ शेतकऱ्यांना पहिल्या यादीत विशिष्ट क्रमांक मिळाला आहे. सर्व संबंधित पात्र शेतकऱ्यांनी प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ घेण्यासाठी आपले सरकार सेवा केंद्र, ई-सेवा केंद्र अथवा संबंधित बँकेच्या शाखेत जाऊन आधार प्रमाणीकरण युनियन बँक ऑफ इंडिया २२ करून घ्यावे. अभिजित राऊत, जिल्हाधिकारी, नांदेड
इतर पात्र शेतकऱ्यांचा विशिष्ट क्रमांकासह याद्या येत्या काही दिवसात प्राप्त होणार आहेत. ही प्रक्रिय संपूर्ण संगणकीकृत असल्याने पात्र शेतकऱ्यांनी गोंधळून न जाता आपल्या मोबाईलवर विशिष्ट क्रमांक प्राप्त झाल्यानंतर शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करून घ्यावे. जिल्ह्यातील जवळपास २१०० शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण शिल्लक आहे. मुकेश बाहाटे, जिल्हा उपनिबंधक नांदेड.
Comments
Post a Comment