50 हजार प्रोत्साहनपर अनुदान येथे पहा दुसरी यादी शेतकऱ्यांना वाटप सुरू

50 हजार प्रोत्साहनपर अनुदान येथे पहा दुसरी यादी शेतकऱ्यांना वाटप सुरू



आधार प्रमाणीकरण करण्याचे आवाहन

पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने प्रोत्साहन अनुदान देण्याची योजना सुरू केली आहे. या योजनेत तालुक्यातील ६ हजार १८ शेतकरी पात्र ठरले आहेत. त्यानुसार तहसील कार्यालयाने २ हजार ५५ शेतकऱ्यांची पहिली यादी प्रसिद्ध केली असून, त्यांच्या खात्यात अनुदानाची रक्कम वर्ग करण्यात आली आहे.

दुसरी यादी येथे क्लिक करून डाउनलोड करा 

राज्यात २०१४ पर्यंत पीक कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाने सन २०१६ साली छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जाहीर करून कर्जमाफी केली. या योजनेअंतर्गत तालुक्यातील शेतकऱ्यांना ५६ कोटी ५७ लाख रुपयांची कर्जमाफी देण्यात आली. यानंतर सन २०१९ साली आघाडी

■ प्रोत्साहनपर अनुदानासाठी पात्र ठरलेल्या पहिल्या यादीतील २ हजार ५५ शेतकऱ्यांपैकी १ हजार ९३५ शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केले आहे; परंतु १२० शेतकऱ्यांचे अद्याप आधार प्रमाणीकरण करणे झालेले नाही.

■ त्यामुळे त्यांना अनुदान मिळालेले नाही. या शेतकऱ्यांनी ताबडतोब आधार प्रमाणीकरण करून घेण्याचे आवाहन तालुका उपनिबंधक संजय भालेराव यांनी केले आहे.

सरकारने सत्तेत आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजना बंद करून महात्मा जोतिबा फुले कर्जमुक्ती योजना सुरू केली. त्यात तालुक्यातील शेतकऱ्यांना ६८ कोटी ७२ लाख रुपयांची कर्जमाफी देण्यात आली, तर नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना याच योजनेअंतर्गत प्रोत्साहन म्हणून शासनाने ५० हजारापर्यंत अनुदान देण्याची घोषणा केली. 

पहिल्या यादीतील २ हजार ५५ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ही रक्कम जमा करण्यात येत आहे. दरम्यान, सन २०१७ मध्ये जाहीर केलेली छत्रपती शिवाजी महाराज किसान सन्मान योजना व २०१९ मधील महात्मा जोतिबा फुले कर्जमुक्ती योजनेतील एकूण १४ हजार ७८६ शेतकऱ्यांची खाती अपलोड झालेली असून, १३ हजार ९४८ शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केलेले आहे.

यादी डाउनलोड करण्यासाठी यावरती क्लिक करा

राज्यात सत्तांतर झाल्यामुळे कर्जमाफीच्या योजनांचा सर्व घटकांना लाभ मिळालेला नाही. काही शेतकऱ्यांना तीन वर्षांतच दोन वेळा कर्जमुक्तीचा लाभ मिळाला. तर २००९ ते २०१३ या काळातील थकबाकीदार शेतकरी या योजनेच्या लाभापासून अद्यापही वंचित राहिला आहे. या शेतकयांच्या कर्ज माफीचा लाभ देण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याची गरज आहे.

यातील २५८ खाती ही तक्रार असलेली खाती होती. यातील १०५ खात्यांची जिल्हास्तरीय समितीद्वारे, तर १५३ खात्यांच्या तक्रारींचे तहसीलदारांमार्फत निवारण करण्यात आल्याचे तालुका उपनिबंधक कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. लवकर दुसरी यादी प्रसिद्ध करण्यात येतणार असल्याचे महसूल विभागाकडून सांगण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करून व्हिडिओ पहा 👇🏻येथे क्लिक करा

Comments