Pik Vima 2022 पीक विम्याची 1200 कोटी भरपाई लवकरच शेतकऱ्यांना मिळणार अतिपावसाने झालेले नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा

Pik Vima 2022 पीक विम्याची 1200 कोटी भरपाई लवकरच शेतकऱ्यांना मिळणार अतिपावसाने झालेले नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा


पुणे : राज्यात अतिपावसामुळे खरीप पिकांचे नुकसान झालेल्या पीकविमाधारक शेतकऱ्यांना 1200 कोटी रुपयांची भरपाई मिळण्यासाठी पाच विमा कंपन्यांकडून युद्धपातळीवर हालचाली सुरूआहेत, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

पंतप्रधान पीक विमा योजनेतील पात्र विमा धारक शेतकऱ्यांच्या खात्यात भरपाईच्या रकमा लवकरात लवकर जमा कराव्यात, अशा सूचना कृषी विभागाने विमा कंपन्यांना दिलेल्या आहेत. 21 नोव्हेंबर अखेर राज्यात स्थानिक नैसर्गिक आपत्ती व मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थिती गटांच्या अंतर्गत पीक विम्यापोटी नुकसान भरपाईची एकूण रक्कम 2148 कोटी रुपये इतकी रक्कम मंजूर झालेली आहे.

मात्र त्या पैकी आता पर्यंत पीक विमा कंपन्यांनी 24.91 लाख शेतकऱ्यांना केवळ 942 कोटींची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना वाटली आहे. उर्वरित शेतकऱ्यांना अद्याप 1205 कोटी रुपयांची भरपाई मिळालेली नाही. त्यासाठी पीक विमा कंपन्यांकडे कृषी विभागा कडून सातत्याने पाठपुरावा सुरू आहे.

राज्यातील शेतकऱ्यांनी नुकसान ग्रस्त दाखल केलेल्या 12.20 लाख पूर्व सूचनांबाबत पीक विमा कंपन्यांनी अद्याप नुकसान भरपाई निश्चित केलेली नाही. मात्र कंपन्यांचे अधिकारी व कर्मचारी या कामकाजाला लवकरात लवकर संपविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे या ठिकाणी सांगण्यात आले.

शेतकऱ्यांना भारतीय कृषी विमा कंपनीकडून 967.30 कोटी रुपये, तर 5.74 कोटी रुपये एच.डी.एफ.सी इर्गो विमा कंपनीकडून मिळणे बाकी आहे. या शिवाय 49.25 कोटी रुपये आय.सी.आय.सी.आय लोंबार्ड विमा कंपनी कडून 166.52 कोटी रुपये, युनायटेड इंडिया विमा कंपनी कडून तर बजाज अलियान्झ विमा कंपनी कडून 16.84 कोटी रुपये अद्याप वाटले गेलेले नाहीत.

येत्या काही काळामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाई सर्व शेतकऱ्यांना मिळणार आहे यापासून कोणताही शेतकरी वंचित राहणार नाही असे राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी या ठिकाणी सांगितलेल्या आहे.

सविस्तर व्हिडिओ पहा 👇🏻

Pik Vima 2022





Comments