शेतकऱ्यांना 'अवकाळी'ची दुप्पट मदत राज्य सरकारकडून अध्यादेश जारी

शेतकऱ्यांना 'अवकाळी'ची दुप्पट मदत राज्य सरकारकडून अध्यादेश जारी

शेतकरी मित्रांनो राज्यात मागील सप्टेंबर- ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसात पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. नुकसानभरपाईसाठी देण्यात येणाऱ्या मदतीपेक्षा वाढीव दराने म्हणजे जवळपास दुप्पट दराने मदत करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. याविषयीचा शासन निर्णय गुरुवारी जारी करण्यात आला असून यात दोन हेक्टरची मर्यादा तीन हेक्टरपर्यंत वाढविण्यात आली आहे. जिरायतसाठी हेक्टरी १३ हजार ६००, बागायतीसाठी हेक्टरी २७ हजार, तर बहुवार्षिकसाठी हेक्टरी ३६ हजार रुपये मदत केली जाणार आहे.

नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्याच्या निर्णयाला मंजुरी अतिवृष्टी व पूरामुळे पिकांचे देण्यात आली होती.



1) पिके- प्रचलित दर- मदतीचे वाढीव दर
जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी: ६८०० रुपये प्रतिहेक्टर दोन हेक्टरच्या मर्यादेत १३६०० रुपये प्रतिहेक्टर तीन हेक्टरच्या मर्यादित


2) बागायत पिकांच्या नुकसानीसाठी : १३,५०० रुपये प्रतिहेक्टर दोन हेक्टरच्या मर्यादित २७ हजार प्रतिहेक्टर तीन हेक्टरच्या मर्यादेत


3) बहुवार्षिक नुकसानीसाठी : १८,००० रुपये प्रतिहेक्टर दोन हेक्टरच्या मर्यादित ३६ हजार प्रतिहेक्टर तीन हेक्टरच्या मर्यादेत

Comments